काँग्रेसचे अशोक जगदाळे यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल ; नगराध्यक्षपदासह नगरसेवक उमेदवारी अर्जांची संख्या झाली १८
नळदुर्ग,दि.१६: शिवाजी नाईक
उमेदवारी दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी
शनिवार दि.१५ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच नगरसेवाकरिता विविध राजकीय पक्षांकडून एकुण १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीसाठी एकुण १८ उमेदवारी अर्जांची संख्या झाली आहे.
नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक दि. २ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर ही आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजीही उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यामुळे रविवार आणि सोमवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
दि. १५ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी पक्षाकडुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत. दि. १४ नोव्हेंबर रोजी. अध्यक्ष पदासाठी शेख मोहम्मद मुजम्मिल अब्दुल लतिफ यांनी अपक्ष म्हणुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून दि. १५ नोव्हेंबर रोजी एकुण ११ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र ६ अ मधुन कादरी तैबा अकबर, प्रभाग क्र. ५ अ मधुन काझी फरहीन आक्रमोद्दीन, प्रभाग क्र. २ अ मधुन बनसोडे अमित राजेंद्र, प्रभाग क्र. ४ अ मधुन कुलकर्णी विजया प्रमोद, प्रभाग क्र. ४ अ मधुन कुलकर्णी विजया प्रमोद, प्रभाग क्र. ५ अ मधुन काझी इल्याजबेगम जहीरोद्दीन, प्रभाग क्र. ५ ब मधुन जाधव तानाजी कोंडीबा, प्रभाग क्र. ४ अ मधुन बेडगे सुरेखा चंद्रकांत व प्रभाग क्र. ४ ब मधुन भाजपचे नेते भुमकर सुशांत सुभाष यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
नगराध्यक्षपदासाठी अशोक जगदाळे यांचा उमेदवारी दाखल
नळदुर्ग(प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवार(१५) रोजी
एक नगराध्यक्ष पदासाठी कांग्रेस चे नेते अशोक जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे, अध्यक्ष पदाच्या उमेदवाराची संख्या एकूण दोन झाली आहे.तर नगरसेवक उमेदवारची संख्या १६ वर गेली आहे.
शनिवारी
काळे मीनाक्षी तानाजी 3-ब,
शेख गौस 8-ब,
शशिकांत माधवराव पुदाले,9-ब, कुरेशी गुलाम रफीकुद्दीन नूरुद्दीन 7-अ,
कुर्सी अफजल ख्वाजा पपु 6-ब, शेख मोहम्मद मुजम्मील अब्दुल लतीफ 9-ब,
शेख मोहम्मद मुजम्मील,
शेख गौस इस्माईल 8-ब,
कादरी तैबा मजहर 6-अ,
वाजी फरहीन साहिद्दीन 5-अ,
बनसोडे अमित रजेंद्र 2-अ,
कुलकर्णी विजया प्रमोद 4-अ,
कुलकर्णी विजया प्रमोद 4-अ,
इल्याज बेगम जहिरओद्दीन 5-अ,
जाधव तानाजी 5-ब,
बेडगे सुरेखा 4-अ,
भुमकर सुशांत 4-ब यांनी नगरसेवक पदासाठी
नगरसेवक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारसाह, सूचक, कार्यकर्ते आदीजण उपस्थित होते.नगरसेवक व अध्यक्ष पदासाठी अर्जाची संख्या दोन झाली आहे, सोमवार (१७) रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.