नळदुर्ग नगरपालिका निवडणूक ; सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्र. ४ मधून सौ.विजया प्रमोद कुलकर्णी यांचा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
नळदुर्ग,दि.१६:
नळदुर्ग नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्र ४ (सर्वसाधारण महिला प्रवर्ग) मधून सर्वाधिक चर्चेत असलेल्या सौ.विजया प्रमोद कुलकर्णी यांचा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज शनिवार दि.१५ नोव्हेंबर रोजी दाखल केले आहे.
कुलकर्णी यांनी नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन विकासाच्या मुद्यावर व कामाच्या जोरावर मतदारा समोर जाणार असल्याचे उमेदवार सौ.विजया प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी श्री.प्रमोद कुलकर्णी,सौ.अमृता कुलकर्णी,सौ.विद्या कुलकर्णी,सौ.प्रिती वैद्य,श्रीमती हेमा कुलकर्णी,श्री.संदीप वैद्य,गणेश बिराजदार,श्री.नितीन कुलकर्णी,अमोल रुपनुर, हणमंत कुलकर्णी यासह समर्थक,नागरिक उपस्थित होते.