नळदुर्ग : आकाश दिलीपराव कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज केला दाखल : प्रभाग चारची हाय होल्टेज निवडणूक होणार?
नळदुर्ग,दि.१६ :
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक हाय होल्टेज प्रभाग क्र ४ ब मधून सर्वसाधारण जागेकरिता आकाश दिलीपराव कुलकर्णी या उच्चशिक्षित तरुण उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र )निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्याकडे आपल्या समर्थक व मित्र परिवारा समवेत सादर केला आहे.
आकाश दिलीपराव कुलकर्णी यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे.ते नळदुर्ग शहरात प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत.
कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमाणसात ओळख आहे.माजी उपगराध्यक्ष दिलीपराव कुलकर्णी यांचे सुपुत्र व माजी नगरसेविका कै.लीलाबाई कुलकर्णी यांचे नातू असा त्यांचा परिचय आहे.अनेकांना वेळोवेळी मदत व सहकार्य करणे हा त्यांचा स्वभाव आहे. पहिल्यांदाच नळदुर्गच्या राजकारणात एका उच्चशिक्षित नगरसेवकपदाच्या उमेदवाराची एंट्री झाल्याने प्रभाग चार मध्ये हाय होल्टेज निवडणूक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
ब्राह्मण गल्ली ,गवळी गल्ली, बेडगे गल्ली व मोहम्मद पन्ना गल्ली हा भाग प्रभाग क्रमांक ०४ असुन या प्रभागात १ हजार ३९८ एवढे मतदार आहेत.
_________________________________
📍जाहिरात 📍
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
नितीन कुलकर्णी
मो.8983828184