नळदुर्ग,दि.१६:
नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग क्रमांक ३ (अ) मध्ये काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष नितीन वसंतराव कासार यांची पाचव्या टर्म साठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग ३ (ब) मधुन सौ.सुमनताई दिलीप जाधव यांनी दुसऱ्या टर्मच़्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत माऊलीनगर ,व्यासनगर, शनिवार वाडा हा प्रभाग क्रं ०३ मध्ये येतो. मागील निवडणुकीत सौ.सुमनताई जाधव याच प्रभाग तीन मधुन निवडणुक लढवुन दणदणीत विजय मिळवला होत.
माजी नगराध्यक्ष नितीन कासार यांची ही निवडणूक लढविण्याची पाचवी टर्म असुन त्यांनी आतापर्यंत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह विविध विषय समितीवर यशस्वी कामगिरी केल्याचे सर्वश्रुत आहे. पुन्हा एकदा कासार व जाधव यंदाच्या नगरपालिका निवडणूकीत याच प्रभागातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी (नामनिर्देशन पत्र )निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्याकडे आपल्या समर्थका समवेत सादर केला आहे.
नितीन कासार यांना राजकीय वारसा लाभलेला आहे.ते नळदुर्ग शहरात प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी नवलकुमार जाधव, अमित शेंड,गे प्रवीण चव्हाण, सोहम कासार ,अमृत पुदाले ,संतोष पुदाले,
सरदारसिंग ठाकूर आदीसह त्यांचे समर्थक उपस्थित उपस्थित होते.