अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नसिमाबी आलिम शेख यांनी काँग्रेस पक्षाकडून दाखल केली उमेदवारी अर्ज
नळदुर्ग,दि.१६ :
अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ (ब) मधून नसिमाबी आलिम शेख यांनी रविवारी दि.१६ नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नळदुर्ग शहरातील इंदिरानगर, वैष्णवनगर , व्यासनगर हा भाग प्रभाग क्रमांक ०२ असून या ठिकाणी २ हजार ११ एवढे मतदार आहेत. आलिम शेख यांनी गेल्या पंधरा वर्षांपुर्वी पासुन राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा चांगला अनुभव असुन आपल्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटविला आहे. लोकहिता बाबत त्यांनी अनेक आंदोलन, मोर्चे काढून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी आलिम शेख यांनी त्यांच्या सुविधा पत्नी नसीमाबी यांना प्रभाग क्रमांक दोन मधुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नसीमाबी शेख यांचा प्रभागात महिला भगिनींशी बचतगटाच्या माध्यमातून मोठा संपर्क आहे. त्यांनी अनेक महिलांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. महिला संघटना मजबुत करण्यासाठी व त्यांच्या विकासाठी कटीबद्ध असुन त्याची विशेषतः महिला मतदारांत सर्वाधिक चर्चा होत आहे.