एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकपदाचे उमेदवारी अर्ज घेतली मागे ; सहा नगराध्यक्षासह नगरसेवक पदांसाठी ८९ उमेदवार निवडणुक रिंगणात 

नळदुर्ग,दि.२१: शिवाजी नाईक 

  नळदुर्ग येथील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार ( दि.२१) रोजी एकूण १८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामध्ये मोहोम्मद मुजम्मील शेख यांनी आपले  नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे, एकुण १७ नगरसेवक पदासाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यापूर्वी गुरुवार ( दि. २०) रोजी चार जणांनी उमेदवारी मागे घेतली होती.अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ८९ उमेदवार असे एकूण ८९ उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत.


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा' ,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट), शिवसेना ( उबाठा ) व शिवसेना शिंदे गट, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत,यनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आम आदमी पार्टीने आपले उमेदवार उभे केले नाहीत, दरम्यान बुधवार (२६) रोजी उमेदवारांना निवडणुक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे.
_____


नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज शेख मोहम्मद मुज्जमील यांनी (अपक्ष ) मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात उतरले आहे.
   नगरसेवक पदाचे छाननी अंतिम वैध उमेदवार १०४ होते. त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१ उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात ८९ उमेदवार उतरले आहे. 
   नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार बसवराज धरणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय बताले, काँग्रेसचे अशोक जगदाळे, एमआयएम कडून शहबाज काझी, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महेबूब शेख, अपक्ष उमेदवार ताजोद्दीन शेख असे मिळून नगराध्यक्ष पदासाठी  सहा उमेदवार  आहेत.


  🔶यांनी घेतले अर्ज मागे🔶 


प्रभाग क्रमांक ०१ ,राठोड झिमाबाई (अपक्ष), प्रभाग क्रमांक 2 - शेख मिनाज, (एमआयएम), कल्पना गायकवाड (अपक्ष), वैशाली चौधरी(राष्ट्रवादी शरद पवार गट), प्रभाग क्रमांक 5- फरहीन काझी(अपक्ष), प्रभाग क्रमांक 6 अफजल कुरेशी, (अपक्ष), हसन सय्यद(अपक्ष), मलिक शेख (अपक्ष) प्रभाग क्रमांक 7 मुबीन कुरेशी(अपक्ष), प्रभाग क्रमांक 8 गौस शेख(अपक्ष), सय्यद जहागिरदार इम्रान (अपक्ष), पद्माकर घोडके (अपक्ष), प्रभाग क्रमांक 9 मोहम्मद मुज्जमिल शेख (अपक्ष), मुद्स्सर शेख (अपक्ष), प्रभाग क्रमांक 10, संदीप गायकवाड (अपक्ष), किशोर नळदुर्गकर (अपक्ष), ताजोदीन शेख(राष्ट्रवादी शरद पवार गट), असे मिळून या निवडणुकीत 21 उमेदवारानी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे.

 
Top