आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आश्वासनानंतर मातंग समाजाची नाराजी दुर ; समाजाचा भाजपास जाहिर पाठिंबा 


नळदुर्ग, दि.२१:


भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आश्वासनानंतर मातंग समाजाची नाराजी दुर झाली असून नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मातंग समाज बांधवांचा पाठिंबा जाहीर केला आहे.


नगरपालिका निवडणुकीत मातंग समाजाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या समाज बांधवांनी  मतदानावर बहिष्कार टाकला होता.
याची दखल घेऊन  आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनील चव्हाण,  राज्य सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शहरातील साठेनगर येथे भेट देवुन सविस्तर चर्चा केली.
 नाराज झालेल्या मातऺग समाजाने आमदार पाटील यांच्या आश्वासननंतर निवडणुकीवरील बहिष्कार माघार घेत भारतीय जनता पक्षास जाहिर पाठिंबा  दिल्याची माहिती शिवाजी गायकवाड यांनी दिली.


यावेळी नळदुर्ग नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे,  माजी नगराध्यक्ष विनोद (पिटु) गऺगणे, निहाल काझी,  दत्तात्रय दासकर, नय्यर जहागिरदार,  सुनील उकंडे , दत्तात्रय कोरे, किशोर बनसोडे,  सलीम बागवान, मानवर सुलताना कुरेशी, बऺडु पुदाले,यांच्यासह , नगरसेवक पदाचे उमेदवार रिझवान काजी, सोहेल बागवान, याऺच्यासह  प्रमुख प्रतिष्ठित मान्यवर  उपस्थित होते.


यावेळी  साठेनगरच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत शिवाजी गायकवाड यांनी केले. याप्रसंगी धनराज गायकवाड, प्रकाश काळे, नारायण हजारे, आजय गायकवाड, सुभाष पारडे, नवनाथ काळे, केशव गायकवाड, अविनाश काळे, करण देडे, आकाश गायकवाड यांच्यासह महिला, नागरिक  उपस्थित होते.

 
Top