नगरसेवक पदाचे उमेदवार   कमलाकर चव्हाण थेट मतदारांशी भेट घेत प्रचाराची घोडदौड सुरू; मतदारांचेही उत्स्फूर्त प्रतिसाद 


नळदुर्ग,दि.२२:


काँग्रेस -शिवसेना युतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण यांचा मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत निवडणूक प्रचार सुरु आहे.मतदाराचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत शहरातील  प्रभाग क्रमांक नऊ (ब) मधुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तथा माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण  हे नगरसेवकपदाची  निवडणुक लढवत  आहेत.हा प्रभाग भवानीनगर, प्राध्यापक कॉलनी, व्यकंटेशनगर , माने प्लॉटिंग व रहीमनगर असे असुन येथिल मतदार बहुतांश सुरक्षित आहेत.
नगरसेवक पदाचे उमेदवार कमलाकर चव्हाण हे १९८५ सालापासुन शिवसैनिक कार्यकर्ता ते उपजिल्हा प्रमुख पर्यंत मजल मारली. दरम्यानच्या काळात ते शिवसेनेचे आंदोलनकारी , लढवय्ये नेते म्हणून नावारुपास आल्याचे सर्व ज्ञात आहे. 


नळदुर्ग नियोजित तालुका निर्मितीबाबत आंदोलन, शहरातील पाणी पुरवठा, परिसरातील शेतकऱ्यांना न्यायासाठी केलेले आंदोलन, महामार्गाचा प्रश्न, शहरविकासाठी सातत्याने ते तळमळीने अनेक आंदोलन केली आहेत. त्यातच सन २०११ मध्ये प्रभाग क्रमांक एक मधुन नगरसेवक पदी निवडणूक लढवुन त्यांनी दणदणीत विजय मिळविले होते.


नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी चव्हाण हे ताकदीने उतरले असुन प्रभागातील थेट मतदारांशी भेट घेत प्रचार करीत असुन मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 
Top