राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष , नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारास उत्साहात सुरुवात
नळदुर्ग,दि.२२ :
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष व प्रभाग ९ चे नगरसेवक पदाचे उमेदवार महेबुब सत्तार शेख त्याचबरोबर याच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार मंगलताई उध्दव सुरवसे यांच्या प्रचारार्थ शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधुन "डोअर टू डोअर" मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भवानीनगर, रहीमनगर, प्राध्यापक कॉलनी ,व्यकंटेशनगर ,माने प्लॉटिंग, रामलीला नगरसह संपूर्ण प्रभाग पिंजुन काढीत आहेत.
या प्रभागात असलेल्या (ब) सर्वसाधारण पुरुषसाठी नगरसेवक पदाच्या जागेसाठी पंचरंगी लढत होत आहे. तर (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असून या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. या प्रभागात १ हजार ७१२ एवढे मतदार आहेत.
प्रचारात समीर सुरवसे, इंजबाम शेख, मोहम्मद कुरेशी, हजी बेग, संदीप सुरवसे, तयब बागवान, आरबाज शेख, समीर शेख, दादा येडगे, अजर शेख, अफसर पटेल, अवेज शेख, मोहीन जमादार, बबलू कुरेशी, रहेमान बागवान आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.