महामार्गावर भरधाव क्रुझरचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात चौघे ठार तर १२ जण गंभीर जखमी 


नळदुर्ग,दि.२२: 


महामार्गावर भरधाव क्रुझरचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात चौघे ठार तर १२ जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . सोलापूर -हैद्राबाद महामार्गावरील अणदुर ता.तुळजापूर गावाजवळ शनिवार दि.२२नोव्हेंबर रोजी पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान हा भिषण अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.सर्व प्रवासी सोलापूर जवळील कासेगाव -उळे गावचे असल्याचे समजते.

अणदूर गावाजवळील  उमरगा चिवरी पाटी जवळ हॉटेल नॅशनल जवळ धावत्या क्रूझर गाडीचे टायर अचानक फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. 


या अपघाताची मिळालेली माहिती अशी की,सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरून जाणारी एक क्रूझर जीप अणदुर गावाजवळ  आली असता, अचानक गाडीचे टायर फुटले. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला.  वाहनातील ३ महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एका जखमींचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अणदूरमधील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत वाहनात अडकलेल्या  जखमींना  प्रवाशांना बाहेर काढुन  उपचारासाठी नळदुर्गच्या उपजिल्हा  रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेत असताना आणखी एका जखमी प्रवाशाचा मृत्यू झाला. त्यामुळे  अपघातातील मृतांची संख्या ४ वर पोहचली असुन जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


अपघातातील मयताचे नावे पुढीलप्रमाणे आहे.
पूजा हरी शिंदे वय ३० या. उळेगाव, सोनाली माऊली कदम वय २२, राहणार हडपसर पुणे, साक्षी बडे वय १९ राहणार हडपसर पुणे तर एका मयताचे नाव समजु शकले नाही.


जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहे.


रुद्र हरी शिंदे वय १२, ओमकार हरी शिंद वय २०,
 माऊली कदम वय ३०, रा. हडपसर, पुणे, आकाश दत्ता कदम वय २५, रा. हडपसर, पुणे,अंजली रविंद्र आमराळे वय १५,  बालाजी पांडुरंग शिंदे वय ४७ ,कार्तिकी रवींद्र अमराळे १३, श्लोक हरी शिंदे वयात८, शिवांश माऊली कदम वय एक, हरी बाळकृष्ण शिंदे वय ३६, कल्याण भिसे वय ३२, इत्यादी.


सोलापूर उमरगाकडे निघालेल्या क्रुझरचे  पुढचे टायर फुटल्यामुळे ही वाहन दुभाजकावर चढून उलटली लटी शेवटी बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जोरदार आदळल्याने ही दुर्घटना घडली. 


 
Top