बारामती , पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास करत चेहरामोहरा 
बदलणार; राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नळदुर्गात आवाहन 

नळदुर्ग, दि.२३: शिवाजी नाईक 


राज्याचे अर्थ खाते माझ्याकडे असुन बारामती व पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकासाकरीता आणि  चेहरामोहरा बदलण्यासाठी नळदुर्ग  नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग शहरात आयोजित राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) प्रचार सभेत केले.
नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जासह सर्वांगीण विकासासाठी घड्याळ मतदान चिन्हावर करून नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शनिवारी रोजी  सायंकाळी ७ वाजता शहरातील  मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भवानी चौकात आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचार सभेत ते बोलत होते.



नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने महायुतीला फाटा देत नगराध्यक्ष पदावर संजय बताले यांच्यासह नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा शनिवार रोजी  सायंकाळी  सव्वा सात  वाजता सुरु झाली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जे बोलतो ते करुन दाखवतो,असे सांगत नळदुर्ग तालुका करण्याबरोबरच नळदुर्गच्या विविध समस्या कायम स्वरुपी सोडवल्या जातील. ऐतिहासिक, धार्मिक ओळख असलेल्या या शहराचे पर्यटन व धार्मिक स्थळांच्या नावलौकिकात वाढ करण्यात येईल.शासनस्तरावर किल्ला संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत.बेरोजगार तरुणांना रोजगार, लोकहिताच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. संजय बताले, मुश्ताक कुरेशी यांनी यापूर्वी निवडून आले आहे. विकास कामाची त्यांना जाण आहे. शहरवासियांचे समस्या सोडविण्यासाठी व शहराच्या विकासासाठी , राजकारण करण्याची संधी मिळावी म्हणून बहुतांश नवख्या उमेदवारांना राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट दिल्याचेही त्यांनी सांगितले . 
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी रात्री येथील भवानी चौकात सभा झाली. विकासासाठी राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी प्रचारसभेत केले.यावेळी अनेकांनी राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला.त्याचे स्वागत उपमुख्यमंत्री पवार यांनी केले . त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या निवडणूक वचननामा पत्राचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, 
अल्प संख्यांक सेलचे शफीभाई शेख, नगरसेवक पदाचे उमेदवार मुश्ताक कुरेशी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 
व्यासपीठावर शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, , संजय बताले,  रवी महाराज राठोड (उमेदवार),
 अजित जुनोदी , समीर मोरे, अँड आनंद बताले, कार्यकर्ते विजय डुकरे, गौस इनामदार, बबलु इनामदार, बंटी बताले, मनोज राजमाने, संतोष वाले, कल्याणी कलशेट्टी, लखन खांडेकर
यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रमोद कुलकर्णी यांनी  मानले.


_________________________________
📍जाहिरात 📍 
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे  सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
नितीन कुलकर्णी 
मो.8983828184
***************
 
Top