भाजप उमेदवावारांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची आज पदयात्रा व सभेचे आयोजन

 
नळदुर्ग,दि.२३ :


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपचे आज रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे यांनी दिले.

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तुळजापूर तालुक्याचे नेते सुनील चव्हाण आदीसह भाजप  पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 
ही पदयात्रा शहरातील शासकीय विश्रामगृहा पासून निघणार आहे. बस स्थानक मार्गे शहरातील मुख्य रस्त्यावरून चावडी चौक, क्रांती चौक, ऐतिहासिक किल्ला गेट या ठिकाणी या पदयात्रेचे समारोप होणार सभेत  होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे यांनी दिली.

 
Top