शिवसेना उमेदवार कमलाकर उर्फ काका चव्हाण यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा; नळदुर्ग नगरपालिका निवडणूक २०२५ नळदुर्ग,दि.२३:
नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ चे शिवसेना उमेदवार कमलाकर उर्फ काका चव्हाण यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा. गेली ३८ वर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या सुत्रानुसार पिडित आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी नळदुर्ग शहरात व तालुक्यात अनेक जनआंदोलने उभे केली. त्यात श्री तुळजाभवानी साखर कारखाना शेतकऱ्याच्या उसाला योग्य भाव मिळावे, तसेच तुळजापूर तालुक्यात भुईमूग शेंगा बियापासून तेल उद्योग उभे करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवण्यासाठी आंदोलन केले.
९० च्या दशकात नरेंद्र बोरगावकर यांच्या पेट्रोल पंपाची जकात न. प. ने माफ केले होते. ही जकातन.प.ला भरावे यासाठी आंदोलन उभे केले. ते सबंध महाराष्ट्रभर गाजले. आंदोलन दडपण्यासाठी कमलाकर चव्हाण यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. ज्या ज्या वेळी नळदुर्ग व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व सर्वसामान्य माणूस शासनाच्या योजनेपासून वंचित राहिले. त्या त्या वेळी कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने उभे करून शासनास न्याय देण्यास भाग पाडले. सन २०११ ते २०१६ या कालावधीत नगरसेवक म्हणून नळदुर्ग वासियांची सेवा करण्याची संधी मिळाली.
त्यावेळी एकच वर्ष पाणी पुरवठा सभापती म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. त्या काळात पाणीपुरवठा कर्मचाऱ्यासमवेत अहोरात्र कष्ट घेऊन शहरवासीयांना तीन दिवसानंतर ठरलेल्या वेळेतच पाणी देण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठ्याची मोटार बिघाड झाली तरी पदरमोड करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवला. त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत ८ अ ची नक्कल, रहिवाशी, जन्म दाखला, मृत्यू दाखला हे अर्ज केल्यानंतर तीन दिवसांनी मिळायचा. पण त्यांच्या कार्यकाळात ज्या दिवशी अर्ज आला त्याचदिवशीच विविध दाखले मिळावे म्हणून त्यांनी न. प. च्या बैठकीत ठराव करून घेतला. सर्वसान्य लोक अडचणीत आले त्या त्या वेळी ते त्यांच्या मदतीस उतरले.
फुलवाडी येथील टोलनाक्यावर नळदुर्ग शहरातील चार चाकी वाहनास टोल घेत होते. शहरातील काही वाहन मालकांनी त्यांची भेट घेवुन ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी याचा गांभीर्याने विचार करून टोल नाक्याच्या विरोधात आंदोलन उभे करून २३ दिवस हा टोल नाका बंद पाडला. याचेच फलित की आज नळदुर्ग शहरातील कुठल्याच चार चाकी वाहनांना टोल भरावा लागत नाही. असे बरेच कामे त्यांच्या हातून झालेली आहेत. आज प्रभाग क्रमांक ९ मधून ते उमेदवार म्हणून निवडणूकीसाठी रिगणात उभे आहेत. आणि त्यांच्या प्रचाराला वेग आल्याचेही दिसत आहे.