प्रभाग क्रमांक ४ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुशांत भुमकर यांच्या कार्याविषयी....नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक -२०२५
नळदुर्ग,दि.२३:
नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत शहरातील प्र. क्रं.४ चे भाजप उमेदवार सुशांत भुमकर यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला लेखाजोखा पुढीलप्रमाणे आहे.
नळदुर्ग शहरात जैन गल्लीतील जैन मंदिर ते लक्ष्मी रोड रस्त्याच्या पेवर ब्लॉकच्या कामास मंजुरी (एकूण निधी १० लक्ष), जैन समाज बांधवांसाठी समाज मंदिराच्या कामास मंजुरी (एकूण निधी ४० लक्ष), श्री. मारुती मंदिर शेजारील प्रस्तावित सभागृहासाठी डीपीडीसी च्या माध्यमातून ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. राजकीय कार्य करत प्रगती करत असताना परिस्थिती सोबत संघर्ष करणाऱ्या आबालवृद्धांसाठी श्री. सुशांत सुभाष भूमकर यांनी संवेदनशीलपणे कुठलीही प्रसिद्धी न मिळवता मेहनतीने योगदान दिले आहे. त्यासाठी त्यांना तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सतत पाठबळ दिलेले आहे. ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरित्री विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी, आणि नेरूळ, मुंबई येथील तेरणा हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया, तसेच वेळोवेळी रक्तदान शिबिरे असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात श्री. सुशांत भूमकर यांचा पुढाकार राहिलेला आहे.
सर्व जग कोरोना महामारीच्या काळात झुंजत असताना नळदुर्ग शहरात गरजू लोकांना जेवणाचे डबे, किराणा किट, मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यासाठी ते नेहमीच सर्वतोपरी सहकार्य केले.
आपला प्रभाग स्वच्छ, प्रकाशमय, आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या भूमकर यांनी नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आखलेली रुपरेषाः युवक-युवतींच्या हाती रोजगार / स्वयंरोजगार, नळदुर्ग शहराला उद्योगसंपन्न बनवण्यासाठी एमआयडीसीसाठी प्रयत्नशील (मागणी मंत्रालयात प्रस्तावित आहे). नळदुर्ग शहरातील बहुतांश युवक-युवती रोजगारासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. हे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि स्थलांतरित नागरिकांना नळदुर्ग शहरातच स्वयं रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुशांत भूमकर आणि नळदुर्ग भाजपा खंबीरपणे उभे असतील. शेतकरी आणि कृषी व्यवसायांच्या विकासासाठी नळदुर्गमध्ये एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती). नळदुर्ग आणि पंचक्रोशीतील शेतकरी हे शेतमाल विक्रीसाठी तुळजापूर, सोलापूर, मुरुम, लातूर, उमरगा यांसारख्या बाजारपेठांची वाट धरतात. त्यांचा वाहतुकीचा खर्च आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी आपल्या शहरातच एपीएमसी मार्केट व्हावं यासाठी त्यांनी आग्रही एपीएमसी मार्केटची मागणी मंत्रालयात प्रस्तावित आहे.
सर्वोत्तम पायाभूत सुविधा. पाणी, वीज, उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधा या सर्वोत्तमच असल्या पाहिजेत हे ठणकावून सांगताना या पायाभूत सुविधा सेवांच्या बाबतीत कुठलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही प्रभागातील नागरिकांना श्री. सुशांत भूमकर देत आहेत. प्रभाग क्रमांक चार तसेच नळदुर्ग शहर सध्या उघड्या आणि तुंबलेल्या गटारांमुळे त्रस्त असून त्या जागी भुयारी गटार योजना राबवण्याची संकल्पना प्रस्तावित असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल अशी खात्री या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी दिले आहे .
सर्वसमावेशक, शाश्वत आणि सर्वांगीण विकास, नळदुर्ग शहर आणि प्रभाग क्र.४ हा विविधतेने नटलेला प्रभाग आहे. यात सर्वधर्मीय, सर्वजातीय लोकं गुण्या गोविंदाने नांदतात. या सर्वांचाच सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध राहण्याचा त्यांचा मानस आहे. येत्या काळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात प्रभागच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नळदुर्ग शहराच्या शाश्वत वृद्धीसाठी प्रयत्नशील आहेत.