उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहरात सभेचे आयोजन 


नळदुर्ग,दि.२१ : 


उमेदवाराच्या प्रचारासाठी नळदुर्ग शहरात उद्या शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.यंदाच्या निवडणुकीत  होत असलेली ही सभा पहिलीच आहे. 

नळदुर्ग नगरपालिका निवडणूकीतील राष्ट्रवादी  (अजित पवार गट) उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार  यांची जाहीर सभा शनिवार दि. २२ रोजी शहरतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भवानी चौकात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते संजय बताले यांनी सांगितले.


 
Top