उमेदवारांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपचे पदयात्रा , "डोअर टू डोअर" गाठीभेटीवर भर


नळदुर्ग,दि.२१ :

शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्तेनी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पदयात्रा काढत "डोअर टू डोअर" मतदाराची गाठीभेटी घेण्यात आली . या पदयात्रे दरम्यान प्रभागातील मतदारांशी हितगुज करत संवाद साधण्यात येत आहे.


प्रारंभी  व्यंकटेशनगर मधील मंदिरात श्रीफळ वाढवून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, प्रभाग ९ चे नगरसेवकपदाचे उमेदवार पांडुरंग पुदाले, श्रीमती मुनवर सुलताना कुरेशी, सुनील उकंडे, किशोर नळदुर्गकर, धिमाजी घुगे, अजय देशपांडे, विशाल डुकरे, बबन चौधरी, अक्षय भोई, संदीप गायकवाड, सुदर्शन पुराणिक, अतुल हजारे, बंडू कसेकर, किरण डुकरे, अनिल उर्फ पप्पू पाटील, सद्दाम कुरेशी, सादिक कुरेशी, अफझल कुरेशी, माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी, रमिजा कुरेशी, हनी काझी, श्रमिक पोतदार, अमर डुकरे, आकाश पुदाले, सचिन बेडगे, संदीप हजारे आदीसह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 
Top