उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस, निवडणूक आखाड्यात कोण  "गजराज" राहणार  किती बाहेर पडणार हे ठरणार

 
नळदुर्ग,दि.२१:


ऐतिहासिक नळदुर्ग  शहरातील नगर परिषदेच्या रणसंग्रामाची औपचारिक नांदी झाली असून राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांचे लक्ष आजच्या शुक्रवार  दिवसाकडे लागले आहे.  अर्ज मागे घेण्याचा आज  अंतिम दिवस आहे.यानंतरच निवडणुक आखाड्यातील खरे चित्र आणि कोणत्या प्रभागात  दुरंगी, तिरंगी, चौरंगी की  बहुरंगी झुंज' होणार, हे ठरणार आहे.


नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या  ७ अर्जापैकी दोघांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. तर सातही अर्ज पात्र ठरले आहेत.दोघे अपक्षांनी  उमेदवारी अर्ज मागे घेतले तर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक पाच उमेदवार निवडणुक रिंगणात राहण्याची शक्यता आहे. आज शुक्रवार दि.२१ रोजी अर्ज माघारीच्या वेळेत  नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अर्ज भरलेल्यांची मनधरणी करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यावर, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अंतिम लढतीत नेमके किती उमेदवार उरणार याचे चित्र स्पष्ट होईल.

नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या  १८९ अर्जापैकी १४२ अर्ज वैध ठरले आहेत. म्हणजेच, अनेक प्रभागांमध्ये विद्यमान वैध उमेदवारांची संख्या भरमसाठ आहे. ४७ अर्ज अपात्र ठरले असले तरी, वैध ठरलेल्या १४२ उमेदवारांमुळे अनेक प्रभागांमध्ये बहुरंगी तर कांहीं ठिकाणीं चौरंगी लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी चौघानी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.  अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरात खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराचा 'धुरळा' उडणार आहे. दि.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आतापासूनच नेत्यांनी आणि उमेदवारांनी आपल्या प्रचाराची रणनीती निश्चित केली असून, शुक्रवारनंतर  निवडणूक प्रचाराला मोठी गती मिळणार  हे निश्चित आहे.


शहरातील सर्व प्रभागात डोअर टू डोअर प्रचारला प्रारंभ : आपलीच उमेदवारी निश्चित आहे, अशी खात्री असलेल्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून सुरुवातीपासुन  सर्वत्र डोअर टू डोअर प्रचारावर सर्वाधिक भर दिला जात आहे.


      ♦️जे.पी.ट्रेडर्स♦️

नोट- आमच्याकडे अस्सल गरम मसाला, सुका मेवा, तांदूळ योग्य दरात मिळतील.
 पत्ता - इनामदार गल्ली नळदुर्ग
मो. 09850292702


 
Top