नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील चार अपक्ष उमेदवारानी नामनिर्देशन पत्र मागे घेतले
नळदुर्ग ,दि.२० :
येथील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी छाननीत वैध ठरलेल्या चौघे अपक्ष उमेदवारानी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना गुरुवार दि..२० नोव्हेंबर रोजी चार अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १४२ जणांचे अर्ज वैध ठरले होते.यामधील प्रभाग क्रं.१० ब- शेख हुसेन मलिद मकसूद, प्रभाग क्र. ७ अ -कुरेशी अल्ताफ फारूक, प्रभाग ८ ब- शेख फुरखान इमाम, प्रभाग क्र. ६ ब -सय्यद मोहम्मद शब्बीर अली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अपक्षांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न व उपाय अधिकृत पक्ष्यांच्या उमेदवारांकडून योजले जात आहेत, अनेकांची मनधरणी करण्यात येत आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर निवडणुक रिंगणात किती उमेदवार राहणार यांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर दि. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवाराना निवडणुक चिन्ह वाटप होवुन अंतीम यादी जाहीर करण्यात येणार आहे.