रवी महाराज राठोड यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल 

नळदुर्ग,दि.१७:

नगरपालिका निवडणूकीसाठी नळदुर्ग  शहरातील प्रभाग क्रमांक ०१ (अ) मधुन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रवी (महाराज )माणिक राठोड यांनी नगरसेवकपदाकरिता आपला उमेदवारी अर्ज रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.

वसंतनगर दुर्गानगर प्रभाग क्रमांक ०१ असून  एवढी मतदारांची संख्या १ हजार ६६८ एवढी आहे.रवी महाराज राठोड यांच्याबद्दल नागरिकात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
या पभागातुन यापुर्वी दोन नगरसेवक कायम निवडून आले.तर दोन नगराध्यक्षपदी राहिले आहे.मात्र या प्रभागातील समस्या आहे तशाच आहेत. मी सत्तेवर नसतानाही लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिलो आहे.आपण लोक अग्राहा खातर ही निवडणूक लढवित आहे . असे बोलताना रवी महाराज राठोड यांनी सांगितले.

उमेदवारी दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे नेते संजय बताले, जेष्ठ नेते शफी शेख, अजित जुनोदी ,कृष्णा राठोड, संतोष राठोड, भानुदास राठोड, फुलचंद राठोड, विनायक जाधव, बाबु राठोड, काशिनाथ राठोड, लावु जाधव, ज्योतीबा  चिंबोरे, करण चव्हाण, संजय जाधव, गणेश राठोड, दिलीप राठोड,
आदीसह समर्थक , कार्यकर्ते उपस्थित 
 
Top