भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांना उमेदवारी जाहीर, समर्थकांनी केला  शहरात जल्लोष साजरा 


नळदुर्ग,दि.१७ : शिवाजी नाईक 

नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून  नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे नळदुर्ग मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बसवराज धरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची उमेदवारी धरणे यांना जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीष बाजी करत जोरदार स्वागत करत जल्लोष साजरा केला.

बसवराज धरणे यांनी  शेवटच्या क्षणी भाजप कार्यकर्त्यांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सोमवार दि.१७ रोजी दाखल केले आहे.  
शहरातील ऐतिहासिक किल्ला गेट, चावडी चौक, 
जय भावानी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, नगरपालिकेसमोर व संविधान चौकात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यानी फटाके फोडून आनंद साजरा केला. प्रारंभी संविधान चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार, सुनिल उकंडे, रिजवान काझी, सुशांत भुमकर, दत्तात्रय कोरे, पांडुरंग पुदाले,  सुभाष भोई, सचिन बेडगे, सिराज काझी, परमेश्वर धरणे, बंडू पुदाले, दिपक कांबळे, दत्तात्रय  दासकर, स्वपनिल काळे, आदीसह त्यांचे समर्थक,कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील , तुळजापूर तालुक्याचे भाजप नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. नळदुर्ग नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाच्या वतीने सज्ज  असल्याचे उमेदवार बसवराज धरणे यांनी बोलताना सांगितले.


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण १८९ अर्ज प्राप्त 

 
नळदुर्ग नगर परिषद निवडणूकिचा १० प्रभागातून २० नगरसेवक आणि एक अध्यक्ष निवडले जाणार आहे .सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १११ उमेदवारी अर्ज दाखल  झाले आहे. तर  आजपर्यंत एकुण १८९  उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवारी तर नगरसेवक पदासाठी १७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

 काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत.  अर्जाची छाननी होवून त्यात वैध ठरलेले  नामनिर्देशन पत्र काढून (परत) घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत आहे.

नगरध्यक्ष निवडणूकिकडे सर्वांचे लक्ष -

अर्ज भरण्याचा शेवटच्या तारखे पर्यंत भाजपकडून बसवराज (अप्पा) धरणे, काँग्रेसकडून अशोक जगदाळे, राष्ट्रवादी (अजित पवार गट ) कडून संजय बताले, एम आय एम कडून शहबाज काझी,राष्ट्रवादी (शरद पवार गट ) कडून महेबूब शेख यानी प्रमुख्याने नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत तर इतर काही उमेदवारांनी ही अध्यक्ष पदासाठी  उमेदवारी अर्ज भरले आहेत, अर्ज माघारी घेण्याच्या मुदती  नंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
 
Top