नळदुर्ग :  प्रभाग एक मध्ये प्रचारापुर्वीच रंगत वाढली;  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सौ. सुशीला विनायक जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नळदुर्ग,दि.१८:

नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक  ०१  मध्ये रंगत वाढली आहे. या प्रभागातून सौ. सुशीला विनायक जाधव
 यांनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या तर्फे नगर परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज सोमवार दि.१७  नोव्हेंबर रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर  यांच्याकडे दाखल केला आहे. 

अर्ज सादर केल्यानंतर सौ. सुशीला विनायक जाधव यांनी बोलताना सांगितले की, वसंतनगर, दुर्गानगरसह प्रभागातील गेल्या अनेक दशकांपासून भिजत पडलेल्या राहात्या घर जागेची (हक्काचा कबाला) अठ अ नक्कलचा प्रश्न, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांचे काम, स्वच्छता व्यवस्थापन, पथदिवे, महिलांसाठी उपयुक्त योजना आणि युवकांसाठी रोजगारपर उपक्रम या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. उमेदवारी दाखल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी महाराज राठोड हे   उपस्थित होते. उमेदवारी दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात होता.

सौ. सुशीला विनायक जाधव यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी नगरपालिका कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करण्यात आले.यावेळी जेष्ठ नागरिक भानुदास राठोड, विनायक जाधव, काशिनाथ राठोड,बाबू राठोड, कंटू चव्हाण, गणेश राठोड, दत्ता जाधव, संजय जाधव, रत्‍नाबाई राठोड,  विमलाबाई जाधव , शांताबाई जाधव, शाहुबाई चव्हाण, शानूबाई राठोड, लताबाई जाधव, कमळाबाई राठोड, गजराबाई गायकवाड, राजूबाई राठोड,  इराप्पा पवार शिवाजी सोमवंशी तम्मा दुर्लेकर हनुमंत बंडगर सिद्राम देवकर, लालू जाधव , जेष्ठ नागरिक माणिक राठोड, किरण राठोड, सौ. रेणुका राठोड आदीसह समर्थक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

          ♦️जाहिरात♦️

_________________________________
📍जाहिरात 📍 
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे  सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
नितीन कुलकर्णी 
मो.8983828184
 
Top