नळदुर्ग : छाननीत १८९ अर्जापैकी नगराध्यक्ष पदाचे ७ व नगरसेवक पदाचे १०४ अर्ज वैध तर ४७ अर्ज विविध कारणास्तव बाद
नळदुर्ग, दि.१८ : शिवाजी नाईक
मंगळवार दि १८ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग नगरपालिकेत उमेदवारी अर्जाची झालेल्या छाननीत १८९ अर्जापैकी नगराध्यक्ष पदाचे ७ व नगरसेवक पदाचे १०४ अर्ज वैध झाले असून ४७ अर्ज विविध कारणास्तव बाद ठरले आहे. तर उर्वरित बाद ठरलेले अर्ज हे एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेल्या पैकी आहेत.
नळदुर्ग नगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी दाखल नामनिर्देशन पत्र १८९ पैकी एकूण ४७ जणांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी छाननीत बाद करण्यात आले. तर १४२ अर्ज वैध ठरले. दरम्यान शुक्रवार (दि.२१) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
नळदुर्गमध्ये पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकूण १८९ अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी तब्बल ४७ अर्ज छाननीत नामंजूर झाले. बसवराज धरणे (भाजप) , अशोक जगदाळे (काँग्रेस) संजय बताले (राष्ट्रवादी अजित पवार गट ), शहबाज काझी (एमआयएम) आणि महेबूब शेख (राष्ट्रवादी शरद पवार गट ) ,मोहम्मद मुजम्मील शेख (अपक्ष), ), ताजोद्दीन शेख (अपक्ष ) हे ७ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी विधिग्राह्य रीतीने वैध ठरले आहेत. अपूर्ण अर्ज, पक्षाचा ए. बी. फॉर्म, जोडपत्र नसने व इतर कारणाने बाद ठरलेले एकूण नामनिर्देशन पत्राची संख्या ४७ आहे,तर वैध अर्जाची संख्या १४२ अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दिली.
🏵️यांचे अर्ज वैध आहेत -🌸
प्रभाग क्रमांक 1- छमाबाई राठोड, रेश्मा पवार, सुशीला जाधव, रानुबाई पवार, झिमाबाई राठोड, रवी महाराज राठोड, कैलास चव्हाण, दत्ता राठोड, निरंजन राठोड, प्रभाग क्रमांक 2- अमित बनसोडे, मारुती खारवे, मारुती वाघमारे, शंकर वाघमारे, सखाराम गायकवाड, चंद्रकांत दस, मुशीराबि शेख, राधा पवार, सुमन ठाकूर, मिनाज शेख, कल्पना गायकवाड, वैशाली चौधरी.प्रभाग क्रमांक 3- नितीन कासार, दत्तात्रय दासकर, ओम सागर कलशेट्टी, मिनाक्षी काळे, सुमन जाधव, मैरुन्निसा शेख, अनिसाबेगम बाडेवाले, प्रभाग क्रमांक 4- विजया कुलकर्णी, सुरेखा बेडगे, अपर्णा बेडगे, खैरूनिसा मासूलदार, आकाश कुलकर्णी, सुशांत भूमकर, संजय बताले, प्रभाग क्रमांक 5- फरहीन काझी, इल्याजबेगम काझी, रेखा सुरवसे, राणी सुरवसे, मुमताज शेख, संध्याराणी मुळे, तानाजी जाधव, शोएब काझी, अरबाज शेख, शहबाज काझी, आनंद बताले.प्रभाग क्रमांक 6- तैवा कादरी, मन्नाबी कुरेशी, आसमा बागवान, हसीना कुरेशी, रिजवान काझी, अफजल कुरेशी, हैदरअली कुरेशी, आनंद पुदाले, गौस शेख, मलिक शेख, मुजतबा सय्यद, मोहमद सय्यद, हसन सय्यद. प्रभाग क्रमांक 7- मुस्ताक कुरेशी, अब्दुल गफूर कुरेशी, अल्ताफ कुरेशी, गौसअहमद कुरेशी, मुबीन कुरेशी, जुलेखाबेगम इनामदार, शहेनाबेगम खतीब, हजाराबी पटेल, प्रभाग क्रमांक 8- गौस इस्माईल शेख, इमाम शेख, फुरखान शेख, पद्ममाकर घोडके, ओंकार कलशेट्टी, जहागिरदार स.अजहर, सय्यद जहागिरदार इम्रान, दत्तात्रय कोरे, शोभा कांबळे, कमल गायकवाड, संगीता कांबळे.प्रभाग क्रमांक 9- महेबुब शेख शशिकांत पुदाले, मोहम्मद मुज्जमिल शेख, कमलाकर चव्हाण, खालेद इनामदार, आमेर शेख, मोहम्मद मुद्स्सर शेख, मदिना बागवान, मंगल सुरवसे, मनोहर कुरेशी, प्रगती महाबोले, प्रभाग क्रमांक 10- शंकर पुदाले, संदीप गायकवाड, सचिन राठोड, हुसेन शेख, अजयकुमार बागडे, रमेश पिस्के, गौस रजवी, नय्यरपाशा जहागिरदार, ऋषिकेश कांबळे, ताजोद्दीन शेख, किशोर नळदुर्गकर, अनिता रणे, प्रियंका सुरवसे, साक्षी नळदुर्गकर, महादेवी बनसोडे आदींचे अर्ज वैध ठरले आहे.
♦️या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले♦️
राठोड झिमाबाई, चव्हाण कैलास, संभाजी कांबळे, सुमन ठाकूर, वैशाली चौधरी, नशीब शेख, छायाबाई गायकवाड, अन्नपूर्णा जाधव, सुप्रिया पुराणिक, संध्या भूमकर, बसवराज धरणे नगरसेवक पदाचे अर्ज, मुकुंद नाईक, आनंद बताले, राणी सुरवसे, अमोल सुरवसे, रईसा बागवान, अफझल कुरेशी, धनराज गायकवाड, रिजवान काझी, गौस अहेम्मद कुरेशी, शौकत आली कुरेशी,शहनाबेगम खतीब, शेख गौस इस्माईल, पद्माकर घोडके, अफरोज शेख, सय्यद जहागीरदार, जहागीरदार स पाशा, मंगल सुरवसे, अंजुमन कुरेशी, सुनिता घुगे, धिमाजी घुगे, शशिकांत पुदाले, मधुशीला बागडे, महादेवी बनसोडे, अजयकुमार बागडे, जहागीरदार नय्यर पाशा, साक्षी नळदुर्गकर, किशोर नळदुर्गकर, काझी अबु सलमान जरहिरोदिन (4 अपत्य असल्याने अर्ज बाद), सुनील उकंरडे, जहागीरदार नय्यर पाशा प्र. क्र. 10- भाजप (दोन अर्ज सूचक दुबार असल्याने बाद झाले, तर एक अर्ज स्विकारल्याची माहिती आहे.