नळदुर्ग : भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांचे झंझावाती प्रचारास प्रारंभ
नळदुर्ग,दि.२० :
येत्या दि.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या नळदुर्ग नगरपालिका अध्यक्षपदासह नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा झंझावातास उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नळदुर्ग येथील भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज ऊर्फ अप्पा धरणे आणि २० जागेवरील नगरसेवक उमेदारांच्या प्रचार शहरातील वसंतनगर, दुर्गा नगर या प्रभाग १ मधुन प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीस वसंत नगर येथील श्री जगदंबा व सेवालाल मंदिर, महादेव मंदिर व हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून पदयात्रेस सुरूवात करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत निघालेल्या भव्य रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली . याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधण्यात आले. उमेदवारांनीही प्रभागातील विकासकामांची माहिती दिली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी आणि युवकांनी रॅलीत उत्साहात सहभागी झाले होते. प्रचाराच्या शुभारंभाने कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला असून आगामी दिवसांत प्रचार अधिक वेगाने राबवला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड नितीन काळे, सुशांत भुमकर, सुनिल उकंडे, नय्यर जागीरदार, दत्ता कोरे, श्र मिक पोतदार, पांडूरंग पुदाले, विशाल डुकरे, अक्षय भोई, ज्ञानेश्वर घोडके, गौसकुरेशी, संजय राठोड, सतीश राठोड, बाळू पवार यासह नागरिक उपस्थित होते.