नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत धन शक्ती विरुध्द जन शक्तीची लढाई असल्याचे मत


राष्ट्रवादी  अजित पवार गटाची पत्रकार  


 नळदुर्ग,दि.२०: 


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) होऊ घातलेल्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढवित असताना मतदार राजा नगराध्यक्ष व नव्या दमाचे २० नगरसेवकपद निवडून देतील व धनशक्तीचा बिमोड करतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नगरध्यक्ष पदाचे उमेदवार संजय अण्णा बताले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दाखविला.


 नळदुर्गचा विकासाचे धोरण मनात ठेवून चोहीकडे सर्वांगीण विकास करून शहराची वाटचाल विकासाकडे नेण्याचे व सर्व समाज जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून शहराचा विकास करू हे एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे,शाश्वत मूलभूत सुविधेसह नागरिकांना आधुनिक ड्रेनेज सिस्टम,मोक्याच्या रिकाम्या जागी १लाख झाडे लावून त्याचे संगोपन,लहान मुलं व वृद्धासाठी नाना नानी पार्कची निर्मिती यासह अनेक सोयी सुविधा पूरविन्याचा अजेंडा बताले यांनी बोलताना सांगितले. 


याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख,माजी नगरध्यक्ष मुश्ताक कुरेशी, प्रमोद कुलकर्णी, रमेश पिसके, रवी महाराज राठोड,समाजसेवक अजहर जाहगीरदार,खालेद इनामदार, अजित जुनैदी, वसीम काझी, गौस शेख,योगेश सुरवसे,समीर मोरे यांच्यासह कार्यकर्ते, उमेदवार उपस्थित होते.


नळदुर्गची लढत बहुरंगी 


 अध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार असल्याने चूरस निर्माण झाली आहे,राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन्ही गट, भाजप, काँग्रेस व एमआयएमचे उमेदवार मैदानात उतरल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणुकीत बहुरंगी होणार असल्याचे चित्र दिसत आहे,शुक्रवार (२१) पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

 
Top