उच्चशिक्षित कैलास चव्हाण यांच्या उमेदवारीने नागरिकांचे वेधले लक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून निवडणूक रिंगणात 


नळदुर्ग,दि.२०:
 
उच्चशिक्षित असलेल्या व  सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कैलास चव्हाण नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी वसंतनगर, दुर्गानगर प्रभाग ०१ मधुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहे. 

कैलास चव्हाण यांनी कायद्याचे उच्च शिक्षण घेतलेले असुन वसंतनगर, दुर्गानगर प्रभाग एक (ब ) सर्वसाधारण पुरुष गटासाठी असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून  त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. 
चव्हाण यांनी बोलताना म्हणाले की, या प्रभागातुन आजपर्यंत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मंडळींनी प्रभागात विकास काम केल्याचे दिसून येत नाही. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी मला सर्वज्ञात आहेत. या प्रभागातील कष्टकरी गोरगरीब हा समाज मोठा आहे. त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी व प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात  उतरलो आहे. या प्रभागात  १ हजार ६६८  मतदार आहेत.निवडणुकीतील चुरस वाढणार असून, प्रभाग ०१ च्या विकासासाठी ही लढत कशी होईल हे मतदारांचे उत्सुकता वाढवणारे  आहे.


 
Top