नळदुर्ग: नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढतीची उत्सुकता शिगेला ; सहाजण  रिंगणात  तर नगरसेवक पदासाठी ६७ नवखे उमेदवार आखाड्यात उतरले

नळदुर्ग ,दि.२५: शिवाजी नाईक 

 नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्षासह ६, तर नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.त्यापैकी ६७ उमेदवार 
नव्या चेह-याचे आहेत.


विविध राजकीय पक्षांच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारात राष्ट्रीय काँग्रेस - सेना उबाठा १९  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  प्रत्येकी २० जागेवर, भाजप १८ जागेवर, तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १२  जागेवर उमेदवार उभे केल्यामुळे चौरंगी लढत होत आहे. याशिवाय एएमआयएम -४, शिंदेसेना दोन, बहुजन वंचितकडून३   २, उद्धवसेना व समाजवादी पक्षाचे प्रत्येकी १, तर अपक्ष ६ उमेदवारही या निवडणुकीत नशिब अजमावत आहेत.

या निवडणुकीत १५ आजी-माजी नगराध्यक्ष , नगरसेवक  निवडणुक लढवत आहेत. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष नितीन कासार,  शहबाज काझी, मुस्ताक कुरेशी, दत्तात्रय दासकर, मंगल सुरवसे, मुनवर सुलताना कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष अपर्णा बेडगे,  संगीता कांबळे,माजी नगरसेविका छमाबाई राठोड, निरंजन राठोड, सुमन जाधव, बसवराज धरणे, संजय बताले, दत्तात्रय कोरे, कमलाकर चव्हाण आदींचा समावेश आहे.


नगराध्यक्ष व नगरसेवक विविध पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात असून, उर्वरित ६७ उमेदवार हे नवखे आहेत. नगरपालिका निवडणुकीत यावर्षी दहा प्रभागांतून २० नगरसेवक व एक नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. यासाठी पुरुष व महिला, असे एकंदरीत १७ हजार १२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सोशल मीडियावर प्रचाराला आला वेग आला असून ८३ उमेदवार  शर्यतीत .


नगराध्यक्ष पदाचा एकमेव योग्य उमेदवार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्याने सोशल मीडियावरसुद्धा प्रचाराने वेग घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून  सर्वच पक्षांच्या वतीने पदयात्रा, रॅली, ध्वनिक्षेपक व पोस्टर लावलेली वाहने प्रत्येक प्रभागातून प्रचार मोठ्या प्रमाणात  करीत असल्याचे दिसून येत आहे.


नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अशोक जगदाळे, भाजपाचे बस्वराज धरणे, राष्ट्रवादी (घड्याळ) संजय बताले, राष्ट्रवादी (तुतारी) महेबुब शेख, एएमआयएम शहाबाज काझी यांच्यासह अपक्ष उमेदवार ताज्जोद्दीन शेख हे निवडणूक लढवित आहेत. नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेल्या नय्यरपाशा जहागिरदार यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी नगरसेवक पदाची उमेदवारी देवून बस्वराज धरणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. यामुळे नय्यरपाशा जहागिरदार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा होत आहे.



 
Top