राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांच्या प्रचारासाठी नागरिकांचा पुढाकार ; प्रभाग एक सर्वाधिक चर्चेत
नळदुर्ग, दि.२५:
राजकीय पक्षांच्या पदयात्रा, कोपरा बैठक आणि आधुनिक डिजिटल प्रचाराने नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत इतर प्रभागाच्या तुलनेत प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वाचे लक्ष वेधले आहे. याठिकाणी नगरसेवक पदासाठी चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले असुन उमेदवार रवी महाराज राठोड , सुशिला जाधव यांच्या प्रचारासाठी नागरिकांनीच पुढाकार घेतल्याने प्रभाग एक सर्वाधिक चर्चेचा विषय होत आहे. दुर्गानगर - वसंतनगर प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार रवी महाराज राठोड, सुशीला जाधव यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला असून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
प्रचारात भानुदास राठोड, काशिनाथ राठोड, विनायक जाधव, बाबू राठोड, संजय जाधव, गणेश राठोड, सूर्यकांत चव्हाण, दत्ता जाधव, अजित चव्हाण, तेजस राठोड, दिलीप राठोड, अनिल जाधव, संतोष जाधव, लालू जाधव, गोविंद राठोड, रेणुका राठोड, शानूबाई राठोड, विमल जाधव, ऋतुजा जाधव, ताराबाई जाधव, लताबाई जाधव, रत्नाबाई राठोड, सुनिता राठोड आदी प्रचारात सहभागी झाल्याचे उमेदवार रवी महाराज राठोड यांनी बोलताना सांगितले. दुर्गानगरसह वसंतनगर प्रभागातील रखडत पडलेले अनेक प्रश्न सोडविण्यासाठी , कष्टकरी समाज बांधव, भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी ,सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडणुक लढवित असल्याचे राठोड यांनी सांगितले.