नळदुर्ग : निवडणुक प्रचारात  "एमआयएम"नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहबाज काझी जोमात


नळदुर्ग,दि.२४:


ऑल इंडिया माजलीसे इत्तेहाद मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे  नगराध्यक्षपदाचे उमेदवार शहबाज अबुल उलुम काझी  व पक्षाने उमेदवारी दिलेले ३  नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ  रविवार (२३) नोव्हेंबर रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ५ व ६ मधुन "डोअर टू डोअर" मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे.

शहराच्या सर्वांगीण विकास, तळा गळा पर्यंत लोकांना विविध योजना मिळवून देणे व मूलभूत नागरी सुविधा पूरविने मुद्द्यावर एमआयएम कडून मत देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एमआयएमच्या प्रचारासाठी बाजार लाईन, काझी गल्ली, किल्ला गेट, कुरेशी गल्ली, पांचपीर भाग,मराठा गल्ली, रहीमनगरसह आदी  संपूर्ण भाग पिंजुन काढीत आहेत.


नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होत आहे.यामध्ये 'एमआयएम' कडून शहबाज काझी हे निवडणुक रिंगणात आहेत,त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे,ते सोशल मीडियासह बाजार लाईनमध्ये  डिजिटल आधुनिक चलचित्र संचद्वारे तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेणे, डोअर टू डोअर प्रचारावर भर देत आहेत,त्यांच्या पदयात्रा, प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.या प्रचारात शहबाज काझी यांच्या समवेत शोएब काझी, अजहर शेख, रहमतुल्लाह मोज्जन,प्रमोद बनसोडे, प्राण कांबळे, प्रदीप गायकवाड, हमदानी काझी, बबलू जमादार आदि कार्यकर्ते पुढाकार घेत सहभागी झाल्याची माहिती  शहबाज काझी यांनी दिली आहे.

 
Top