काँग्रेस -शिवसेना(उबाठा) नगरसेवक पदाचे उमेदवार कमलाकर चव्हाण यांनी  घेतले  प्रचारात वेग
नळदुर्ग दि. २४:


 शहरातील  भवानीनगर, रहीमनगर , व्यकंटेशनगर, ठाकरेनगर आदी भागात काँग्रेस -शिवसेना(उबाठा) चे उमेदवार कमलाकर चव्हाण हे प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचारात वेग घेतला असुन नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.


काँग्रेस - शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाकर चव्हाण नगरसेवक पदाची निवडणूक लढवित आहेत. चव्हाण यांनी बोलताना सांगितले की,ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांसह समाजातील घटकावर अन्याय होतो, त्या त्या वेळी आपण शिवसेनाच्या माध्यमातून अन्यायला वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे समाज कार्य नळदुर्ग शहराने पाहिले आहे. समाजकार्याच्या जोरावर मी ही निवडणूक लढवत असून, प्रचारा दरम्यान पदयात्रेस आणि मतदाराच्या गाठीभेटीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असेही उमेदवार कमलाकर चव्हाण यांनी सांगितले.सरदारसिंग ठाकूर, सोमनाथ म्हत्रे, शाम कनकधर, संतोष पुदाले, नेताजी महाबोले भीमा कोळी, अक्षय कोळीआदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top