प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेसचे अशोक जगदाळे यांची पदयात्रा व कॉर्नर सभा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नळदुर्ग,दि.२४:
नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वसंतनगर दुर्गानगर प्रभाग क्रमांक एकमध्ये पदयात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर कोपरा बैठक घेण्यात आली.त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रविवार रोजी शहरातील दुर्गानगर येथे पदयात्रा व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या पदयात्रेत प्रभाग एकचे नगरसेवक पदाचे उमेदवार दत्ता राठोड व रेश्मा पवार या नव्या चेहऱ्यांना सेवा करण्याची संधी मतदारानी द्यावी.त्याकरिता या उमेदवारान विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी महिला,पुरुष,नागरिकांसह शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण, सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले, ताजोद्दीन सय्यद यांसह काँग्रेसचे - शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.