सर्वांगीण विकास करुन नळदुर्गचे रुपडे बदलण्यकरिता भाजप-सेनेच्या  सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन 


नळदुर्ग,दि.२४ : शिवाजी नाईक 


मतदारांनी दोनवेळा मला विधानसभेत पाठविले असुन त्याबद्दल ऋणी आहे . मी प्रामाणिकपणे शहराचा विकास करण्याचे काम केले आहे. नगरपालिका निवडणूकीत चारित्र संपन्न, सर्वधर्मिय उमेदवार दिले असुन यापुढे शहराचे सर्वांगीण विकास करुन रुपडे बदलण्यकरिता भाजप-सेनेच्या पाठिशी खंबीर उभे राहुन  सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरात  उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ  प्रसंगी जाहिर  सभेत केले.


नळदुर्ग येथे भाजप शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भव्य भव्य रॅली रविवारी सायंकाळी ६:३० वाजता काढण्यात आली. या रॅलीचे  ऐतिहासिक किल्ला गेट येथे जाहीर सभेत रुपांतर झाले.यावेळी  आमदार राणाजगजितसिंह पाटील हे बोलत होते.  मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी तालुक्याचे नेते सुनील चव्हाण, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, निहाल काझी,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, साहेबराव घुगे,दत्ता राजमाने, सरपंच युवराज पाटील, सिध्देश्वर कोरे,दिपक आलुरे आदीसह निवडणुकीतील  भाजप, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


नळदुर्ग शहरात सात दशकांच्या कालावधीत  कधीही विकास झाले नाही . एवढे प्रचंड विकास भाजपच्या काळात झाले असुन या कामाची माहिती घरा घरात पोहचुन बालचमूनाही ज्ञात झाली आहे. झालेल्या विकासाबद्दल प्रत्येकानी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 


महाराष्ट्राचा पर्यटन स्थळ म्हणून नळदुर्ग शहर विकसित करुन किमान एक हजार बेरोजगाराना रोजगार उपलब्ध होईल.नळदुर्ग तालुका निर्मितीची वाटचाल सुरु झाली आहे. अपर तहसिल कार्यालय, महावितरणचे उपविभागीय कार्यालय, कार्यान्वित झाले असुन लवकरच  दुय्यम निबंधक कार्यालय सुरु होण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.


नितीन काळे यांनी सांगितले की, शहराचे चित्र बदलण्याचे काम भाजपच्या माध्यमातून सुरु असून २४ तास शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता, मुलभूतसुविधा पुरवून किल्ले पर्यटन, उद्योग धंदे आणून  नागरी शहर म्हणून नळदुर्ग शहराचा नावलौकीक होणार आहे.

बसवराज धरणे, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके,माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, दत्तात्रय दासकर , नानीमाॅ दर्गाहाचे रिजवान काझी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी नगरसेवक सचिन डुकरे, अशोक बंजारे यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सुत्रसंचलन व आभार विनायक अहंकारी यांनी मानले.


संविधान चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण केले., त्यांनतर हनुमान मंदिर, बु-हाण शाहवली, सादेख शाहवली दर्गा आदी ठिकाणी दर्शन घेतले. यावेळी शहरातील चौका चौकात फटाक्याची जोरदार अतीषबाजी करण्यात आली आहे.


 
Top