राष्ट्रवादी (शरद पवार गट)  नगराध्यक्ष व नगरसेवक  उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ; जिवनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती 


नळदुर्ग,दि.२३:


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवाराच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नळदुर्ग येथे राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
रविवारी दि, २३ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक एक (वसंतनगर) मध्ये असलेल्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मेहबूब शेख, नगरसेवक पदाचे उमेदवार कैलास चव्हाण, रानुबाई पवार, तालुका अध्यक्ष धर्यशिल पाटील, संदीप सुरवसे, अँड अमोल पाटील, आदीची प्रमुख उपस्थिती होती. 


त्यानंतर प्रभागात मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत  घरोघरी घरी भेट देऊन उमेदवाराचा प्रचार केला.  या प्रचारा दरम्याइंजबाम शेख, मोहम्मद कुरेशी, हजी बेग,  तयब बागवान, आरबाज शेख, समीर शेख,  अजर शेख, अफसर पटेल, अवेज शेख, मोहीन जमादार, बबलू कुरेशी, रहेमान बागवान आदी उपस्थित होते.
 

 
Top