काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रचारासाठी प्रभाग क्रमांक ७ व ८ मध्ये मतदारांशी संपर्क करत उमेदवारानी साधले संवाद
नळदुर्ग,दि.२५:
निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील इनामदार गल्ली,कुरेशी गल्ली,हात्ती गल्ली या प्रभाग क्रमांक ७ आणि चांभार गल्ली ,कासार गल्ली, हात्ती गल्ली, भिमनगर या भागातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष अशोक जगदाळे व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी पदयात्रा काढुन, व कोपरा बैठक घेण्यात आली आहे. यावेळी नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमास काँग्रेस-सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक पदाचे उमेदवार कुरेशी अब्दुलगफूर अब्दुलअजीज व इनामदार जुलेखाबेगम मैनोद्दीन, तसेच प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार गायकवाड कमल गोविंद व शेख इमाम मुनाफ उपस्थित होते.
पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील विविध समस्या जाणुन घेतल्या. स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेदरम्यान नागरिकांना नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी व स्थिर प्रशासनासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी दोन्ही प्रभागातील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थक उपस्थित होते.