प्रभागातील विविध व्यथा नागरिकांनी मांडल्या; काँग्रेस -सेनेचे उमेदवार कमलाकर चव्हाण यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु
नळदुर्ग,दि .२५ :
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नळदुर्ग शहरात काँग्रेस शिवसेना उबाठा युती नगराध्यक्ष उमेदवार अशोक जगदाळे आणि प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक उमेदवार कमलाकर चव्हाण यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील सुरू असलेल्या प्रचार फेरीवेळी त्यांनी घरोघरी भेट देवुन प्रचारांवर सर्वाधिक भर दिला आहे. समाज कार्याच्या मुद्द्यावर आपण निवडणूकीला सामोरे जात आहे. त्यामुळे काहीही झाले तरी जनता आपल्या पाठीशी आहे .असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रभागातील पाणी पुरवठया बाबतच्या तक्रारी , अंतर्गत रस्ते, स्वच्छता व गटारी समस्या, अशा विविध समस्याबाबत कमलाकर चव्हाण यांच्याकडे नागरिकांनी व्यथा मांडल्या. यावेळी आपल्याला बहुमताने सभागृहात पाठवा आपण या नक्कीच समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास कमलाकर चव्हाण यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.