नळदुर्ग,दि.१४: शिवाजी नाईक
नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि.१४ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज तर नगरसेवक पदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.त्यामुळे नगरसेवक पदासाठी आता उमेदवारी सहा झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी मोहोम्मद मुजम्मील शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र.९ मधून शशिकांत माधवराव पुदाले,व मुजम्मील शेख यांचा अर्ज,प्रभाग क्र ८ मधून गौस शेख, प्र. क्र.७ मधून गौस अहमद कुरेशी, प्र. क्र.६ मधुन अफजल कुरेशी यांचा नगरसेवक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारसाह, सूचक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.नगरसेवक पदासाठी अर्जाची संख्या एकूण सहा झाली आहे, सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल न होण्याचे कारण म्हणजे अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे शेवटच्या दोन तीन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिका कार्यालयात मोठी गर्दी उसळणार आहे.
उमेदवारांनी नामनिर्देशन ऑनलाईन पद्धतीने भरून ते पिठासन अधिकाऱ्याकडे सादर करावयाचे आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना दोन सुचक तर अपक्ष उमेदवारांना पाच सुचक असणे आवश्यक आहे. राखीव गटासाठी ५०० रुपये तर सर्वसाधारण गटासाठी एक हजार रुपये एवढे अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे.
_________________________________
📍जाहिरात 📍
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
नितीन कुलकर्णी
मो.8983828184