सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलसह दिग्गज नेत्यांची नळदुर्ग शहरात उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीची जाहीर सभा 

नळदुर्ग, दि.२७ :

नळदुर्ग नगरपालिका निवडणुक प्रचारार्थ 
राष्ट्रवादी (अजित पवार गट ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले व सर्व  नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहरात सायंकाळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदिसह अनेक  दिग्गजांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रचार प्रमुख अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख यांनी दिली आहे.

या सभेला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ.नवाब मलिक,माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, विधान परिषदेचे आमदार ईद्रीस नाईकवाडी यांची जाहिर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, गोकुळ शिंदे,जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, सभेला मतदारासह नागरिकांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन शफीभाई शेख यांनी केले आहे.
 
Top