जेष्ठ विचारवंत पन्नालालभाऊ यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
नळदुर्ग,दि.०४ :
जेष्ठ समजवादी विचारवंत पन्नालालभाऊ सुराणा यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीत पोकळी निर्माण झाली असून जे कधीही भरून निघणार नाही,असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पन्नालालभाऊ सुराणा यांना श्रद्धांजली आर्पित आयोजित शोकसभेत व्यक्त केले.
जेष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे नुकतेच निधन झाले आहे. नळदुर्ग येथील 'आपलं घर' प्रकल्पात गुरुवारी शोकसभा आयोजित करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, आमदार प्रवीण स्वामी, पन्नालाल भाऊचे पुत्र प्रभास सुराणा, कन्या आरती खरीदे, मुकुंद खरीदे, आपलं घरचे व्यवस्थापक विलास वकील, गुंडू पवार, अँड सयाजी शिंदे, देविदास वडगावकर, बसवराज नरे, कॉ. अरुण रेणके, सुनील पुजारी, निजगुण स्वामी, दयानंद काळुंखे, मानवलोकचे अनिकेत लोहिया, संतोष बुरंगे,सरिता उपासे, प्रल्हाद दुगले, कमलाकर चव्हाण, उषा क्षिरसागर, सुनील क्षिरसागर यांच्यासह आपलं घर येथील विद्यार्थी यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, गृहमाता, राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेच्या प्रारंभी 'आपलं घर'चे व्यवस्थापक विलास वकील यांनी श्रद्धांजली वाहिली.
पुढे बोलताना माजी मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, साथी पन्नालालभाऊ सुराणा यांचे जीवन हे इतरांची उन्नती, समाजकार्यात समर्पित होते.त्यांचे कार्य हे अत्यंत मौलिक, उल्लेखनीय आहे. जे कधी विसरले जावू शकत नाहीत. दिवंगत पन्नालालभाऊ यांच्या निधनाने समाजाचे नुकसान झाले असून, त्यांचे कार्य येणाऱ्या भविष्यातही प्रेरणा देणारे असल्याचे सांगून
त्यांनी पन्नालाल भाऊनी केलेल्या अनेक कार्याना उजाळा दिला. सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले.