महायुतीला भरभरुन मतदान करणा-या
 लाडक्या बहिणी नगरपालिका निवडणुकीत रुसल्या ?


नळदुर्ग, दि.११ : शिवाजी नाईक 


नगरपालिका निवडणूकीत महिला मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसणार?अशी चर्चा सध्या शहरात सुरु असून विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींनी नगरपालिका निवडणुकीत मात्र  मतदानासाठी काही अंशी बाहेर पडणेच टाळलं आहे. त्यामुळे महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत या निवडणुकीत कमी राहिला आहे.


 ४ हजार ५९३ मतदारांची मतदानाला दांडी


 नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत तब्बल ४ हजार ५९३ मतदारांनी म्हणजे तब्बल २७.८६ टक्के मतदारांनी मतदानाला दांडी  मारल्याची  बाब समोर आली आहे. मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील एकूण मतदार संख्या १७ हजार १२२ एवढी आहे. २०  जागांसाठी मतदान झाले. त्यासाठी मतदार संख्या १७ हजार १२२ होती. त्यामध्ये पुरुष ८ हजार ७३६ आणि ८ हजार ३८६ महिला मतदारांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र १२ हजार  ५२९ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.


यावेळी २ हजार १९३ पुरुष मतदार आणि २ हजार  ४०० महिला मतदार अशाप्रकारे एकूण  ४ हजार ५९३ मतदार गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले. मतदार यादीत काही मृत व्यक्तींची नावे असली, तरी हयात असलेल्यांनी मोठ्या संख्येने मतदान टाळल्याने ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.


नळदुर्गमध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी अधिक
 नगर परिषद निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी असुन लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरण्याची शक्यता फोल ठरली. केवायसीची अट लादल्यामुळे लाडक्या बहिणी  मतदानाबाबत निरुत्साह दाखविल्याची चर्चा  होत आहे. यावेळी महिलांच्या मतदानाचा कल पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आल्याने निवडणुकीचा अंतिम निकाल कसा लागणार याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात असले तरी  ही निवडणूक तिरंगी झाली व नगरसेवक पदासाठी २० जागे करिता ८३ रिंगणात होते. कुठे तिरंगी , तर कुठे चौरंगी लढत झाली.
२०१६ मधील ७१.५१ टक्केच्या तुलनेत यंदा मतदानात सरासरी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


तिजोरीची चावी त्यांच्याकडे असली तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे आहेत असा प्रचार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारा शुभारंभ प्रसंगी करण्यात आला. न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख' या चक्रात गेली अनेक वर्ष सापडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्यात यावा असा बडगा सर्वोच्च न्यायालयाने उगारल्यानंतर निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला.  नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून कधीही निवडणूक प्रचार एवढे गाजले नाही. मोठ्या प्रमाणाच्या बाहेर ही निवडणूक गाजली आहे. कारण ही तसेच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा रस घेऊन प्रचार केले आहे. 

विधानसभा निवडणुकीप्रमाणे नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना शिंदे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, तर काँग्रेस- शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, एम आय एम, समाजवादी पार्टी, वंचित या पक्षाने निवडणुका लढविल्या.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top