ईव्हीएम ठेवलेल्या सभागृहाबाहेर कडक पोलिस पहारा; सीसीटीव्हीची चौफेर निगराणी
नळदुर्ग,दि.०८ : शिवाजी नाईक
ईव्हीएम सुरक्षेसाठी एसआरपीएफच्या प्लाटूनसह ८ सशस्त्र पोलिसांचा पहारा,तर बाहेरील सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाचे एक अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी असे दोन शिफ्ट मध्ये १०जण तैनात आहेत, त्यात नगरपालिकेचा तीन शिफ्ट मध्ये प्रत्येकी एक कर्मचारी असे दररोज तीन कर्मचारी असा मोठा फौजफाटा ३ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत तैनात राहणार आहे.
शिवाय २४ तास सीसीटीवीची नजर असुन जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. पोलिस अधिक्षक रितु खरोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख आदीनी नळदुर्ग येथिल स्ट्रागरुमला भेट दिली आहे.गस्तीपथकाची वेळोवळी भेट असुन जिल्हा प्रशासनाची करडी नजर असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) येथे नळदुर्ग नगरपरिषदेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कडक पोलिस पहारा असून, एसआरपीएफ आणि पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त तैनात आहेत.
स्ट्रॉगरूमच्या प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) पलटण आणि अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ८ सशस्त्रबलाचे कर्मचारी दिवस-रात्र परिसराचे रक्षण करत आहेत. विविध ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. एसआरपीएफच्या व्यतिरिक्त, स्ट्रॉगरूम सुरक्षित करण्यासाठी एक पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा असा बंदोबस्त आहे.
एस आर पी एफ चे ८ सशस्त्र पोलिस कर्मचारी व जिल्हा पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व ४ पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकेचा एक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांतील २० नगरसेवक निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार(२) डिसेंबरला झाल्यानंतर उच्च न्यायलयचा आदेशानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे, तोपर्यंत निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम हे पोलिस दलाच्या कडक पाहऱ्या मध्ये जि. प. प्रशाला येथील स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत,परिसरात एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस दलाचे पोलीस बंदोबस्ता साठी तैनात आहेत काही अपवादत्मक परिस्थिती उद्भवलीस तर अग्निशमन दलाची गाडी कर्मचाऱ्यांसाह सज्ज आहे.
पाच टेबलवर होणार मतमोजणी
२१ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.मतमोजणीस प्रारंभ होणार असून पाच टेबल वर मतमोजणी होणार असून एका टेबलवर १ सुपरवायझर, १ पर्यवेक्षक आणि १ मदतनीस असे तीन जण मतमोजणी करणार आहेत, दोन तासात निकाल स्पष्ट होणार आहे.अशी माहिती मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी सांगितले.