नळदुर्ग : नगराध्यक्ष पदाचे पदभार घेतल्याचे औचित्य साधून बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांचा सत्कार
नळदुर्ग नगरपालेकेच्या नगराध्यक्षपदी भाजप महायुतीचे बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांनी पदभार घेतल्याचे औचित्य साधून मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी नवल सामाजिक संस्था व मित्र परिवाराच्या वतीने बसवराज धरणे यांचा शाल , पुष्पहार घालून आणि पेढे भरवुन सत्कार करुन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात झालेल्या सत्कार प्रसंगी भाजपचे माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पत्रकार शिवाजी नाईक, पत्रकार जहिर इनामदार, पत्रकार अजित चव्हाण, सधनशिल शेतकरी अशोक बंजारे, अतुल हजारे,नवल संस्थेचे व्यंकटेश नाईक, अविनाश बंजारे, ओम पाटील, जमन ठाकुर, अक्षय भोई,आदीसह नागरिक उपस्थित होते.