आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत नळदुर्ग नगरपालिकेचे  नुतन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी 
स्विकारला मोठ्या थाटात पदभार 

नळदुर्ग,दि.२९ : 

 नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक होऊन भारतीय जनता पक्षाने घवघवित यश संपादन केल्यानंतर सोमवार दि. २९ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले बसवराज ऊर्फ अप्पा धरणे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार मोठ्या थाटात स्विकारला.

यावेळी नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी  आमदार राणाजगजितसिंह पाटील , भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,  नेते सुनील चव्हाण, ज्येष्ठ नेते नितीन काळे, अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील , संतोष बोबडे आदीसह  पदाधिकारी  उपस्थितीत होते,
 याप्रसंगी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,नळदुर्गच्या जनतेने मतरूपी  विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त करत नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग निहाय शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर करून त्याप्रमाणे विकास कामांची सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

 तत्पुर्वी नगराध्यक्ष बसवराज धरणे व नगरसेवक नय्यरपाशा जाहगीरदार, दत्तात्रय दासकर, शशिकांत पुदाले, तानाजी जाधव, रिजवान काझी,निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, मिनाक्षी काळे, राणी सुरवसे, सुमन ठाकूर, साक्षी नळदुर्गकर आदीसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

 पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की,
शुद्ध पाणी पुरवठा, चांगले रस्ते, शहर स्वच्छता या मुलभूत प्रश्नासोबतच नळदुर्ग तालुका निर्मिती,पर्यटनाशी निगडित रोजगार निर्मिती, येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा तसेच राज्य व केंद्र सरकारच्या नविन योजनांचा पुरेपुर उपयोग
सर्वाच्य सहकार्याने करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
  
 तत्पुर्वी नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांनी शहरवासियांचे जाहीर आभार मानले व पारदर्शक कारभार करण्यासोबत शहराच्या प्राथमिक गरजापुर्ण करून शहराचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. नळदुर्गच्या विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेऊ असा गर्भित इशारा देत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याची विनंतीवजा सुचना केली.
      
कार्यक्रमास  सुशांत भुमकर, विलास राठोड, सिध्देश्वर कोरे, निहाल काझी,किशोर नळदुर्गकर,  यांच्या सह नवनिर्वाचित नगरसेवक, भाजप पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची अतिषबाजी केली.

मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, कार्यालयीन अधिक्षक खलील शेख, प्रकल्प अधिकारी सूरज गायकवाड, पल्लवी पाटील,आदीसह न.प.चे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह भाजपचे सिध्देश्वर कोरे, सरपंच युवराज पाटील, साहेबराव घुगे, सुधीर हजारे, बलदेव ठाकुर, स्वप्ननिल काळे, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, सुनिल चौधरी, सुदर्शन पुराणिक, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके ,किशोर नळदुर्गकर, अजय देशपांडे आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 


नळदुर्ग नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला.  जनतेनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे, समन्वयाने आणि कटिबद्धतेने काम करण्याच्या अपेक्षा  नुतन पदाधिकारी यांच्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या आणि त्यांना भावी कार्यासाठी  शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर  उपस्थित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी, नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत,  त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन   दिले.



 
Top