डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत आसलेला समाज निर्माण करणे गरजचे - पोलिस निरीक्षक सचिन यादव
६ डिसेंबर हा भारतीय इतिहासातील एक भावस्पर्शी, चिंतनशिल अत्म परिक्षण करण्याचा दिवस आहे. हा दिवस केवळ शोक करण्याचे नसुन समाज परिवर्तनाचा संकल्प लोकशाही मध्ये समता, बंधुता न्याय आणि मानवतेच्या मुल्यांना जागवणारा दिवस असल्याचे मत पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी व्यक्त केले.
नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वास रणे यांनी
आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात पोलिस निरीक्षक सचिन यादव हे बोलत होते .
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे, अजयकुमार बागडे, बाळू रणे, देवा कांबळे, फारुक कुरेशी, प्रकाश बनसोडे, दत्ता बनसोडे, नामा यादव, बापू झेंडारे, विकी कांबळे, करण लोखंडे, बबलू जाधव, संभा कांबळे, आयापा भांगे, दिलीप भांगे, पप्पू कांबळे, विनय सोनवणे, रामा झेंडरे, चांगदेव रणे, दिनेश सोनवणे, अनिता रणे, कविता झेंडरे, रश्मी रणे, कलावती भांगे, विमल बनसोडे, चंद्रभागा राजगुरू, झुंबर साबळे, सुजाता लोंढे, सुनंदा सुरवसे आदीसह भिमसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले.