मोहने-आंबिवली येथे बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिष राठोड यांचा गौरव
कल्याण,दि.०८: डिसेंबर
मोहने-आंबिवली ता. कल्याण येथील संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी मंदिरा संत श्री सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात आला व अरदासाच्या जयघोषात पुजा करण्यात आली. यावेळी,बंजारा समाजास हैद्राबाद गॕझेटनुसार आरक्षण मिळावे यासाठी चाळीसगांव तालुक्यातील परशुराम नगर (दडपिंप्री) या गावातील समाजसेवक तथा बंजारा संघर्ष योद्धा,पत्रकार-सतिष राठोड यांचा मंदिर समितीच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी संत सेवालाल महाराज बंजारा व लभाना समाज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभागीय अशासकीय सदस्य-कैलास पवार,ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य-कैलास तंवर,जिल्हा सदस्या-सुमित्राताई जाधव,ॲड.गजानन जाधव,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोक चव्हाण,समाजसेवक-डॉ.युवराज राठोड, संपादक-करसन राठोड, पोलिस निरीक्षक उत्तम राठोड, मंदिराचे पुजारी-विठ्ठल राठोड,विक्रम चव्हाण, सुरेश नाईक,सोमला राठोड,किसन पवार,समाजसेवक-अनिल राठोड,केवलसिंग जाधव,विजय पवार,देवराम राठोड,चंद्रकांत नाईक यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.