श्री क्षेत्र  मैलारपूर येथे  महिला भाविकांसाठी नगरसेविका सौ .अपर्णा बेडगे, नगरसेवक आकाश कुलकर्णी यांच्यावतीने मोफत स्नानगृहाची सुविधा

नळदुर्ग,दि.०३

नळदुर्ग  येथील मैलारपूरच्या श्री खंडोबा  यात्रेत येणा-या महिला भाविक भक्तांना  सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्दात हेतुने काँग्रेसचे नुतन नगरसेवक  आकाश कुलकर्णी व नगरसेविका सौ. अपर्णा अरविंद बेडगे यांनी पुढाकार घेत खास महिला भाविकांना मोफत स्नानगृह सुविधा सुरु केली आहे.

पौष पौर्णिमेनिमित्त भरणा-या  खंडोबाच्या यात्रेसाठी लक्षावधी भाविक मैलारपूरात दाखल होत आहे.   या यात्रेमध्ये येणा-या महिला भाविकांची संख्या मोठी असते. महिला-भगिनींना मोफत स्नानगृहाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने कुलकर्णी व बेडगे यांचे कौतुक होत आहे. यात्रेतील प्रचंड गर्दी लक्षात घेता महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी आहे
 
त्याचबरोबर महिलांनी आपल्या मौल्यवान वस्तू स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित ठेवाव्यात, असा  संदेशही देण्यात आला आहे. महिला सन्मानाला प्राधान्य देणा-या आकाश कुलकर्णी व अपर्णा बेडगे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करत अभिनंदन केले जात आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top