बालाघाट महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीरास गुरुवारपासुन सुरुवात
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता.तुळजापूर जि व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीर (“Not Me But You “) गुरुवार दि. ८ ते १४ जानेवारी दरम्यान चिकुंद्रा ता. तुळजापूर येथे होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर संस्थेचे सहसचिव प्रकाशराव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, उपाध्यक्ष डॉ अभय शहापूरकर, कोषाध्यक्ष अँड ड. प्रदीप मंटगे,सहसचिव शहबाझ काजी , लिंबराज कोरेकर, संचालक बाबुराव चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यांनी केले आहे.