विद्यापिठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण पद्धतीत नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास “अ “ दर्जा प्राप्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरशी संलग्न असलेल्या सर्व ४१९ महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण काही दिवसापूर्वी ऑनलाइन पद्धतीने घेतले होते. या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण पद्धतीत महाविद्यालयाचा दर्जा,क्रिडा विषयक कामे, सांस्कृतिक उपक्रम इ.दी बाबींचा अभ्यास करून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा दर्जा ठरविला जातो. विद्यापीठाच्या या दर्जा निश्चिती उपक्रमात नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने भाग घेऊन “अ “ दर्जा प्राप्त केला आहे. महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल बालाघाट संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हासदादा बोरगांवकर, संचालक बाबूराव भाऊ चव्हाण, कार्याध्यक्ष रामदादा आलुरे यांच्यासह सर्व संस्थेचे पदाधिकारी, पालकांनी य महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.