राष्ट्रीय सेवा योजना शिबिराअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न

मुरूम,दि.०९: 
 
कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम यांच्या वतीने मौजे गणेशनगर येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराअंतर्गत ग्रामीण रुग्णालय, मुरूम व कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरामध्ये उपस्थित स्वयंसेवक व गावातील नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ५७ नागरिकांची रक्तगट तपासणी, सीबीसी, एच.बी.एस.ए.जी., एच.आय.व्ही., रक्तदाब (बी.पी.) व साखर (शुगर) यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद इंगोले, ग्रामीण रुग्णालय, मुरूम येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरदाळे, डॉ. कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय भोसले, समुपदेशक सुजित जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन उपासे, प्रा. प्रसाद इंगोले, प्रा. बालाजी इंगोले, प्रा. रोहन हराळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top