मुरूम पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड
  
मुरूम,दि.०९: डॉ सुधीर पंचगल्ले 

 मुरूम पालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ९) रोजी पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
मुरूम पालिकेत भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले असून नगराध्यक्षपदी बापुराव पाटील हे विजयी झाले आहेत. उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी (ता. ९) रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालिकेच्या उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी रमेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी रमेश चव्हाण यांची उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी स्वीकृत नगरसेवकपदी सूर्यकांत जाधव व श्रीराम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, नितीन काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवानेते शरण पाटील, माजी सभापती मदन पाटील, उमरगा जनता बँकेचे संचालक रफिक तांबोळी, योगेश राठोड, दत्ता चटगे, गटनेते गणेश अंबर, नगरसेवक गौस शेख, रुपचंद गायकवाड आदींसह नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील नगर परिषदेच्या नूतन उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार करताना  नगराध्यक्ष बापूराव पाटील, शरण पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, राजू मुल्ला
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top