नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी
नळदुर्ग, दि.१३ :
राजकारणासह समाजकारणात नेहमी पुढाकार घेणारे भारतीय जनता पार्टीचे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते,भाजपचे राज्य् परिषद सदस्य् सिध्देश्वर आण्णा कोरे यांना होऊ घातलेल्या नंदगाव जिल्हा परिषद गटातुन निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणीस जोर धरत आहे.
सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्य जनतेचा आधारवड ठरणारे भाजपचे नंदगाव येथील कोरे यांनाच नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत. तर वेळप्रसंगी सिद्धेश्वर कोरे यांना वर्गणी करून निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सिद्धेश्व्र कोरे हे नंदगाव ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून सरपंच , उपसरपंच, सदस्य म्हणून जनतेच्या सेवेत आहेत. आपल्या गावातीलच नव्हे तर परिसरातील सर्वसामान्य व्यक्तीस काही अडचण आली, गंभीर प्रसंग ओढावला कि ते धावून मदत करतात. कृषी उत्प्न्न् बाजार समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. शासन आणि प्रशासनातला त्यांचा मोठा अनुभव आहे.गाव विकास आराखड्यातील बारीक सारीक गोष्टीचा त्यांना अभ्यास आहे.अंतर्गत रस्ते,गटारी,पाणी, विज आदी ग्रामस्थांच्या समस्याची त्याना जाणिव आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे ते अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरामध्ये ओळख आहे. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ युवा कार्यकर्ते कोरे यांच्या कामाबद्दल समाधानी आहेत. एखाद्याला दवाखान्याची गरज असेल आजारी असेल किंवा अपघातामध्ये एखादा गंभीर जखमी झाला असेल आणि ते जर कोरे निदर्शना आले तर ते आपला पूर्ण वेळ देऊन त्याच्या उपचार कामी मदत करतात. अनेक वेळा नंदगावसह परिसरातील गंभीर रुग्णांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई तेरणा हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार केल्याचे सर्वश्रुत आहे.याची जाणीव नंदगाव व परिसरातील सर्व गावांना आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातून नांदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपने सिध्देश्व्र कोरे यानाचं उमेदवारी देऊन पूर्ण ताकतिनीशी विजयी करून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी या गटातील गावाच्या ग्रामस्थातून होत आहे. या गटातील वागदरी, गुजनुर,खुदावाडी, दहिटणा,येडोळा, लोहगाव, नंदगाव, सिंदगाव, बोरगाव ( तु.), सलगरा, बोळेगाव आदी गावातील सिद्धेश्व्र कोरे यांचे हितचिंतक कार्यकर्ते यांच्यात चार्चा रंगली आहे.