जि.प. गट १ तर प. स. गण ३ असे एकूण ४ उमेदवारांचे अर्ज मागे ; उमेदवारी मागे घेण्याच्या दि. २७ रोजीच कोणाची माघार व कोण रिगणात होणार स्पष्ट

परंडा,दि.२५ : शहाजी कोकाटे

परंडा तालुक्यातील डोंजा जिल्हा परिषद गटातून सोनारीचे माजी सरपंच पै. नवनाथ भागवत जगताप यांनी  आपला अपक्ष अर्ज मागे घेतला आहे. त्यांची आई माजी जिल्हा परिषद सभापती आविदाबाई भागवत जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी आहे. त्यामुळे नवनाथ जगताप यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला आहे. पुन्हा आपल्या मातोश्रींना निवडून आणण्यासाठी नवनाथ जगताप यांनी प्रचार तयारी सुरू केली आहे. तर सिरसाव पं. स. गणातून रतन संजय अंधारे (अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतला आहे. तसेच दि. २४ प. स. शेळगाव गणातील कौशल्या त्रिंबक शेवाळे (अपक्ष) व खासापूरी गणातील मंदाकिनी मोहन गोडगे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे.
       
सध्या जि.प. गटातुन ७० तर पं.स. गणतुन ११३ उमेदवारांचे अर्ज आहेत. दि. २५ व २६ रोजी सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दि. २७ जानेवारी ही शेवटची जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणातून किती उमेदवार निवडणुकीच्या फडातून माघार घेतात व किती उमेदवार आपले भवितव्य मतदारांवर सोपवतात याचे चित्र दि. २७ रोजी मंगळवारी स्पष्ट होईल.
 
Top